मुंबई | प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक 2026 साठी महायुतीचे जागावाटप अखेर निश्चित झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आणि दावे-प्रतिदाव्यांनंतर 17 जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतिम सहमती झाली आहे.
महायुतीच्या अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. भाजपने आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित झाली आहेत.
भाजपचे 11 उमेदवार
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
- अमरावती : प्रवीण पोटे
- सोलापूर : राजेंद्र राऊत
- सांगली-सातारा : धैर्यशील कदम
- अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
- छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
- नांदेड : अमर राजूरकर
- धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील
- जळगाव : नंदकिशोर महाजन
- नागपूर : राजीव पोतदार
शिवसेनेचे 4 उमेदवार
- ठाणे : रवींद्र फाटक
- नाशिक : नरेंद्र दराडे
- परभणी-हिंगोली : सईद खान
- यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
- पुणे : विक्रम काकडे
17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांच्या जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. आता आवश्यक मतदारसंख्या पूर्ण झाल्याने या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
विधान परिषद निवडणूक 2026 कार्यक्रम
📌 अधिसूचना : 25 मे
📌 उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 1 जून
📌 अर्ज छाननी : 2 जून
📌 अर्ज माघारीची अंतिम मुदत : 4 जून
📌 मतदान : 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4)
📌 मतमोजणी : 22 जून
राज्यातील या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून महायुतीने उमेदवारांची घोषणा करून निवडणूक रणशिंग फुंकले आहे.