भारतीय खलाशांच्या मृत्यूप्रकरणी अमेरिकेची माफीस नकार; भारताचा तीव्र निषेध
ओमानच्या आखातातील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव; व्यावसायिक जहाजांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचे जयशंकरांचे मत
ओमानच्या आखातात अमेरिकन नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पलाऊचा ध्वज असलेल्या ‘एमटी सेट्टेबेलो’ (MT Settebello) या तेलवाहू जहाजावर झालेल्या कारवाईबाबत अमेरिकेने माफी मागण्यास नकार दिला असून, उलट सर्व व्यावसायिक जहाजांनी अमेरिकन सैन्याच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक असल्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, संबंधित जहाजाने अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन करून इराणी तेलाची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी वारंवार दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या घटनेवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून भारताचा अधिकृत निषेध नोंदवला. व्यावसायिक जहाजांवर अशा प्रकारची प्राणघातक कारवाई कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tommy Pigott, Principal Deputy Spokesperson for the US Department of State, says, “US Secretary of State Marco Rubio spoke yesterday with Indian External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar. The two officials discussed recent events in the Strait of Hormuz. The Secretary… pic.twitter.com/OvsjGBLh0a
— ANI (@ANI) June 13, 2026
डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “अमेरिकन नौदलाच्या कारवाईत तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. व्यापारी जहाजांवर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले न्याय्य ठरू शकत नाहीत.”
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आदित्य शर्मा, शिवानंद चौरासिया आणि पटनाला सुरेश या भारतीय खलाशांचा समावेश आहे. जहाजावरील इतर २१ कर्मचाऱ्यांना ओमान प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेनंतर आखाती प्रदेशातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, भारतीय कर्मचारी असलेल्या इतर व्यापारी जहाजांच्या हालचालींवरही भारतीय दूतावासाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अमेरिकेच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणामुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates