राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवला गेला, या सामन्यामध्ये राजस्थानच्या संघाने कमालीची कामगिरी केली. पहिले फलंदाजी करत राजस्थान रॅायल्सच्या संघाने 243 धावा केल्या. यामध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज वैभव सुर्यवंशीने याचे तीन धावांनी शतक हुकले. त्याने आजच्या सामन्यामध्ये 29 चेंडूमध्ये 97 धावा केल्या. त्याने सर्वाधिक सिझनमध्ये षटकार मारण्याचा रेकॅार्ड देखील मोडला आहे. ख्रिस गेल याचा 30 चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा रेकॅार्ड आहे, वैभवने 28 चेंडूमध्ये 97 धावा केल्या होत्या. 29 व्या चेंडूवर मोठा शॅाट मारत असताना प्रफुल हिंगे हा गोलंदाजी करत होता. त्याने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये संघाला वैभवची विकेट मिळवून दिली.
वैभव सुर्यवंशीची जेव्हा विकेट घेतली तेव्हा प्रफुल्ल हिंगे हा फलंदाजाच्या तोंडावर जाऊन सेलिब्रेशन करायला लागला. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम आणि संधी हुकली. हे पाहून चाहत्यांना त्याचबरोबर त्याच्या संघामधील खेळाडूंना पश्चात्ताप झालाच, त्याचबरोबर विरोधी खेळाडूंना देखील पश्चात्ताप झाला. जेव्हा वैभवने विकेट गमावला तेव्हा तो फारच निराश झाला, तो काही वेळ मैदानावर खाली मान घालून होता. यावेळी जेव्हा प्रफुल्ल हिंगे विकेट घेतली तेव्हा तो फारच खुश झाला आणि त्याचा सेलिब्रेशनवर काही क्रिकेट चाहते संतापले आणि त्यांनी प्रफुल्ल हिंगेवर टीका करायली सुरुवात केली.
आजच्या सामन्यामध्ये राजस्थानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन हैदराबादच्या संघाला सुरुवातीला बॅकफूटला टाकले, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाज जेव्हा हैदराबादचे फलंदाजीला आले तेव्हा संघाच्या लवकर विकेट गेल्या आणि संघ बॅकफूटवर गेला. आजच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे तो संघ आयपीएलच्या विजेत्या पदावरुन बाहेर होणार आहे. तर जो संघ आज विजय मिळवेल तो क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी सामना करणार आहे.
क्वालिफायर 2 चा सामना हा महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीच्या संघाने जीटीला पराभूत केले त्यानंतर गुजरातचा संघ आता क्वालिफायर 2 खेळणार आहे.

Leave a Reply