Reliance Jio नेहमीच त्याच्या युजर्सला खुश ठेवण्यासाठी वेगवेगळे स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत असतात. आता जिओने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी आता एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी 200 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. 200 रुपयांचा जिओने लॉन्च केलेल्या प्लॅनमध्ये एंटरटेनमेंट ॲड-ऑन प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 15 ओटीटी प्लॅटफॉर्म आणि 1000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा ॲक्सेस देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणता फायदा होणार आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
रिलायन्स जिओचा तुम्ही 200 रुपयांचा प्लॅन घेतल्यास तुम्हाला यावर विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सिरीज आणि लाईव्ह कंटेंट पाहता येणार आहे. जिओच्या वापरकर्त्यांसाठी ही कंपनीने खास ऑफर लॉन्च केली आहे. कंपनीचे असेही सांगितले की, आता एकाच रिचार्जद्वारे वापरकर्त्यांना अनेक प्लॅटफॉर्म वापरता येणार आहेत. जिओच्या 200 रुपयांच्या प्लॅनला Jio OTT Pass असे म्हटले आहे यामध्ये वापरकर्त्यांना JioHotstar, Sony LIV, ZEE5, YouTube Premium, Prime Video Mobile, Lionsgate Play, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, FanCode, Discovery+, Sun NXT, Times Play आणि Tarang Plus सारख्या प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे.
प्लॅनबद्दल महत्वाची माहिती
या प्लॅनबद्दल महत्वाचे सांगायचे झाले तर हा प्लॅन फक्त डेटाचा ॲड-ऑन पॅक आहे. यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार नाहीत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे. यामध्ये 30 जीबी हाय-स्पीड डेटा ग्राहकांना मिळणार आहे. ज्या वापरकर्त्यांचा बेस प्लॅन सक्रिय आहे, त्यांना ५जी नेटवर्कवर अमर्यादित ५जी डेटाचा लाभ मिळत राहील. जिओने असेही सांगितले आहे की, यूट्यूब प्रीमियम आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे फायदे मायजिओ ॲपद्वारेच मिळवावे लागतील.

Leave a Reply