संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा; “ऑपरेशन तुडवा” सुरू करणार, लढाई लोकसभा, न्यायालय आणि रस्त्यावर लढू
फुटीर खासदारांना 25 कोटी रुपये मिळाल्याचा दावा; सुरक्षा काढून मैदानात येण्याचे खुले आव्हान
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका करत “ऑपरेशन तुडवा” सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आमची लढाई आता लोकसभेत, न्यायालयात आणि रस्त्यावर चालेल. रस्त्यावरची लढाई सुरू झाली असून आता आम्ही “ऑपरेशन तुडवा” राबवणार आहोत, असे राऊत यांनी म्हटले.
फुटीर खासदारांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, हे खासदार निवडणूक हरतील. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे. ते आमच्या चिन्हावर आणि पक्षाच्या ताकदीवर निवडून आले आहेत. आम्ही त्यांना गद्दार म्हणतो, कारण त्यांनी बेईमानी केली आहे.
यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, काही खासदारांना पैशाच्या जोरावर फोडण्यात आले आहे. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये देण्यात आले असून आतापर्यंत 25 कोटी रुपये मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
फुटीर खासदारांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रत्येक खासदाराला मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस सुरक्षा देण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुरक्षा काढून मैदानात या, असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेलाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असून काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांच्या वापराबाबतही त्यांनी टीका केली.
राजकीय वातावरण तापले असताना संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates