आयुक्त तुकाराम मुंढेंची धुळ्यात मोठी कारवाई; 23.50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त
धुळे | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोनगीर टोलनाक्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापेमारी करून प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि मालवाहू वाहनासह तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील गुटखा कारवाईनंतर आता धुळे जिल्ह्यातही तुकाराम मुंढे यांनी कठोर पावले उचलल्याने राज्यभरात अवैध तंबाखू व्यवसायाविरोधातील मोहिमेला वेग आला आहे.
सोनगीर टोलनाक्यावर पहाटेची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोलनाक्यावर संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी संशयास्पद मालवाहू वाहन (क्रमांक HR-55 AE-6821) अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित विमल पान मसाला आणि व्ही-1 टोबॅको तंबाखूची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.
17.76 लाखांचा विमल पान मसाला जप्त
कारवाईत 17 लाख 76 हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला, 74 हजार रुपये किमतीची व्ही-1 टोबॅको तंबाखू तसेच सुमारे 5 लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी राजस्थानमधील सुरेश कुमार बिरबलराम गुर्जर (वय 34) याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FDA ची राज्यव्यापी मोहीम सुरू
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल आणि त्यांच्या पथकाने केली. राज्यभरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठवणूक, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






