Women’s T20 World Cup 2026: विजेत्या संघाला तब्बल 21.87 कोटींचं बक्षीस; उपविजेत्यालाही मिळणार कोट्यवधींची रक्कम
लंडन | क्रीडा प्रतिनिधी
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेचे बिगुल वाजले असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 जून ते 5 जुलैदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदा बक्षीस रक्कम 10 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी एकूण 87 लाख 64 हजार 615 अमेरिकन डॉलर (सुमारे 81.4 कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम मागील स्पर्धेच्या तुलनेत सुमारे 8.06 लाख डॉलरने अधिक आहे.
विजेत्या संघाला किती मिळणार?
स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 23 लाख 40 हजार डॉलर (सुमारे 21.87 कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे. मागील विश्वचषक विजेता न्यूझीलंड संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे.
उपविजेत्यालाही कोट्यवधींचं बक्षीस
स्पर्धेतील उपविजेत्या संघाला 11 लाख 70 हजार डॉलर (सुमारे 10.9 कोटी रुपये) मिळणार आहेत. तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 6.75 लाख डॉलर (सुमारे 6.30 कोटी रुपये) बक्षीस दिले जाणार आहे.
याशिवाय साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी संघांना सुमारे 29 लाख रुपये मिळतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला किमान 2.31 कोटी रुपयांची हमी रक्कम देण्यात आली आहे.
12 teams, seven venues, one ultimate prize 🏆
A comprehensive guide to the biggest-ever Women’s #T20WorldCup 📋https://t.co/g5aDUKWFDK
— ICC (@ICC) June 4, 2026
12 संघांमध्ये रंगणार विश्वविजेतेपदाची लढत
या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून 33 सामने खेळवले जाणार आहेत. सहा-सहा संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश एकाच गटात असल्याने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत.
महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील भारताचे वेळापत्रक
🔹 14 जून – पाकिस्तान विरुद्ध
🔹 17 जून – नेदरलँड्स विरुद्ध
🔹 21 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध
🔹 25 जून – बांगलादेश विरुद्ध
🔹 28 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध
भारतीय महिला संघाने नुकताच एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास रचला असून आता टी-20 विश्वचषक जिंकण्याचे मोठे आव्हान संघासमोर असणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates