नाशिक विधानपरिषदेत कोट्यधीशांची लढत; गणेश गिते ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार
अवघ्या 24 महिन्यांत संपत्तीत 102 कोटींची वाढ; प्रतिज्ञापत्रातील आकड्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
नाशिक, प्रतिनिधी : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या राजकीय ताकदीसोबतच त्यांच्या आर्थिक सामर्थ्याचीही जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गणेश गिते हे तब्बल 177 कोटी 88 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले असून, गेल्या 24 महिन्यांत त्यांच्या संपत्तीत तब्बल 102 कोटी 50 लाख रुपयांची वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची एकूण संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये आहे. मात्र त्यांच्यासमोर उभे असलेले अपक्ष उमेदवार आर्थिकदृष्ट्या अनेक पटींनी सरस असल्याचे दिसून येत आहे. गणेश गिते यांच्याकडे 177 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असून, परवेझ कोकणी यांची संपत्ती 149 कोटी रुपये तर गोकुळ गिते यांची संपत्ती 109 कोटी रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गिते कुटुंबाची संपत्ती सुमारे 75 कोटी रुपये होती. अवघ्या दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत त्यात 102 कोटी 50 लाख रुपयांची भर पडून ती 177 कोटी 88 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या वाढीची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीचे गणितही इतर निवडणुकांपेक्षा वेगळे आहे. मतदारांची संख्या मर्यादित असून पक्षाचा व्हीप लागू होत नाही. तसेच निवडणुकीचा खर्चही उमेदवारांकडून केला जात नसल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उमेदवारांची राजकीय पकड, वैयक्तिक संपर्क आणि प्रभाव यांची कसोटी लागणार आहे.
संपत्तीबरोबरच उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चर्चा सुरू आहे. नरेंद्र दराडे यांच्याविरुद्ध सर्वाधिक पाच गुन्हे दाखल असून परवेझ कोकणी यांच्यावर तीन, गणेश गिते यांच्यावर दोन तर गोकुळ गिते यांच्यावर एक प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत आर्थिक ताकद, राजकीय गणित आणि मतदारांचा कौल या तिन्ही घटकांची निर्णायक भूमिका राहणार आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेचे आकडे चर्चेत असले तरी अंतिम निकाल मतदारांच्या विश्वासावरच ठरणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






