अति घाई संकटात नेई! पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडीजवळ भीषण अपघात; थरारक व्हिडिओ व्हायरल
अचानक वळलेल्या कारला भरधाव वाहनाची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळवंडी बस स्थानक चौकात सोमवारी (दि. 2 जून) दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. महामार्गावरून अचानक वळण घेणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली.
या अपघाताची तीव्रता इतकी होती की, धडकेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महामार्गावरील निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन किती महागात पडू शकते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पिंपळवंडी चौक ठरत आहे अपघातांचा हॉटस्पॉट
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पिंपळवंडी बस स्थानकाजवळील चौक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक चालक महामार्गावरील नियमांकडे दुर्लक्ष करून अचानक लेन बदलतात किंवा वळण घेतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सुरक्षा उपाययोजनांची मागणी
या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेषतः या अपघातप्रवण ठिकाणी रंबल स्ट्रिप्स, गतीमर्यादा दर्शविणारे फलक, चेतावणी फलक आणि वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
वाहतूक तज्ज्ञांनी देखील महामार्गावर वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करणे, इंडिकेटरचा योग्य वापर करणे आणि अचानक लेन बदलणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates