Special Story : मित्र काडीकचऱ्यासारखे वाहून गेले, प्रेतांचा खच अन् डोंगरावरची भयाण रात्र… हादरलेला तरुण म्हणाला, आता कधीच नेपाळला…
महापुराच्या वणव्यातून वाचलेल्या युवकाचा हादरवणारा अनुभव – Nepal flood survivor story
Nepal flood survivor story संदर्भातील मी माझ्या डोळ्यांनी तो महापूर पाहिला. माझ्या समोरच माझे मित्र काडीकचऱ्यासारखे वाहून गेले. प्रलयानंतर प्रेतांचा खच पाहिला. डोंगरावर असल्यामुळे मी वाचलो, पण त्या भयाण डोंगरावर जागून रात्र काढावी लागली. हा प्रसंग आजही आठवला तरी काळजात धस्स होते. मी आता पुन्हा कधीच नेपाळला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नेपाळहून परतलेल्या आशुतोष उपाध्याय यांनी दिली आहे. त्यांचा हा अनुभव ऐकून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. नेपाळच्या जलप्रलयाने आशुतोष पुरते हादरून गेले असून, त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत.
अनुक्रमणिका
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या महाप्रलयाने संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले. हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. वाहून गेलेले हजारो लोक अद्याप सापडलेले नाहीत. अनेक गावे पाण्यात बुडाली. घरे, दारे, इमारती जमीनदोस्त झाल्या. या महापुरात अनेक देशांचे नागरिक अडकले होते. भारताचेही नागरिक यात होते. काही नागरिक सुखरूपपणे भारतात परतले आहेत. गोरखपूरच्या पिपराई येथील रहिवासी आशुतोष उपाध्याय हे देखील नेपाळहून परतले आहेत. मात्र, पूर्वीसारखे ते राहिलेले नाहीत. हतबल आणि हताश झाले आहेत. त्यांनी नेपाळचा तो महाजलप्रलय स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. गोरखपूरला आल्यावर त्यांनी जे कथन केले, त्याने सर्वच हादरले. Nepal flood survivor story संदर्भातील माहिती येथे दिली आहे.
अनेक मित्रांसोबत नेपाळला गेलेले आशुतोष – Nepal flood survivor story
याच वर्षी मार्चमध्ये आशुतोष नेपाळला गेले होते. रसुआ क्षेत्रात ते राहत होते, जिथे या महापुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यांना तेथील अमस्ता नावाच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये पाइपलाईन कंपनीत काम मिळाले होते. तिथेच राहून ते काम करत होते. त्यांचे असंख्य मित्र त्यांच्यासोबत होते. Nepal flood survivor story संदर्भातील माहिती येथे दिली आहे.Nepal flood survivor story
सायरन वाजलाच नाही
आशुतोष यांच्या मते, त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळूनच त्रिशुली नदी वाहत होती. आपत्तीच्या काळात सतर्क राहण्यासाठी सायरनची व्यवस्था होती. मात्र 26 ऑगस्ट रोजी नेमके काय झाले हे देवच जाणे, पण त्या दिवशी अलार्म ऐकायलाच मिळाला नाही. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास अचानक पुराचे पाणी वेगाने आले. पाहता पाहता परिस्थिती इतकी बिघडली की, अनेक लोकांना सावरता आले नाही. सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधीच त्यांना मिळाली नाही.
पळा, पळा, पाणी आले…
माझ्या कंपनीचे ऑफिस एका बहुमजली इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर होते. त्यावेळी अचानक आरडाओरडा ऐकायला आला. पळापळा, पळा पळा, पाणी आले, असा आरडाओरडा ऐकून आम्ही सर्व मित्र डोंगराच्या दिशेने पळालो. त्यावेळी पाण्याचा वेग अधिकच वाढला होता. आमचा एक मित्र डोंगरावर चढू शकला नाही. तो माझ्या डोळ्यासमोरच पुराच्या पाण्यात वाहून गेला, असे त्यांनी सांगितले. Nepal flood survivor story
आम्ही मित्राला वाचवण्यासाठी ओरडत होतो, किंचाळत होतो. पण तिथे मदत करायला कोणीच नव्हते. माझ्या डोळ्यासमोर मी काडीकचऱ्यासारखे 25 ते 30 लोक वाहून गेले. आम्ही सर्व पाहत होतो, हताश होतो, पण काहीच करू शकत नव्हतो, असे ते म्हणाले.
नेटवर्क कोलमडले
महापुरामुळे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे प्रभावित झाले होते. कुणाशीही संपर्क होत नव्हता. आम्ही आमच्या कुटुंबीयांशीही फोन करू शकत नव्हतो. इतर लोकांशीही संपर्क होत नव्हता. आम्ही 24 तास त्या डोंगरावर होतो. आमचे सहकारीही डोंगरावरच होते. आमच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हते, पिण्यासाठी पाणी नव्हते. आम्ही उपाशीपोटीच होतो. कुणी तरी येईल आणि आम्हाला घेऊन जाईल, या आशेवर आम्ही तिष्ठत बसलो होतो. 24 तासानंतर अचानक एक हेलिकॉप्टर आले. त्यानंतर आम्हाला हळूहळू रेस्क्यू करण्यात आले. आम्हाला काठमांडूला नेण्यात आले, असे आशुतोष यांनी सांगितले.
काठमांडूला पोहोचल्यावर आम्हाला दिलासा मिळाला. आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही वाचलो, याची जाणीव झाली. मोठा দিলासা मिळाला. त्या जলप्रलयाच्या काळात कुणाचाच कुणाशी संपर्क होत नव्हता. ऑनलाइनद्वारे आणि फोनद्वारेही बोलता येत नव्हते. सर्व संपर्क व्यवस्था कोलमडलेली होती, असे ते सांगत होते. Nepal flood survivor story

नेपाळला पुन्हा पाय नाही
भारतात आल्यावर आशुतोष यांना पुन्हा नेपाळला जाणार का, असे विचारले असता त्यांनी कानाला हात लावला. आता मला नेपाळला जायचे नाही. नेपाळशी खूपच वाईट आठवणी जोडलेल्या आहेत, असे ते म्हणाले. मी माझ्या असंख्य सहकाऱ्यांना गमावले. चारही बाजूने किंकाळ्या घुमत होत्या. पाण्याचा प्रचंड खळखळाट जाणवत होता. एका क्षणात किती तरी घरे, आयुष्य उद्ध्वस्त झाली, असेही त्यांनी सांगितले.
कुटुंबाची दोन दिवसांची घालमेल
इकडे आशुतोष यांच्या कुटुंबीयांची मोठी घालमेल झाली होती. मुलाचे काय झाले याची चिंता लागली होती. आशुतोषशी संपर्क होत नसल्याने ही चिंता अधिकच वाढली होती. 26 ऑगस्टच्या सकाळी आशुतोष यांच्याशी बोलणे झाले होते. तोपर्यंत सर्व ठीक होते. पण थोड्यावेळात बातम्या सुरू झाल्या आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही आशुतोषशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण संपर्क होत नव्हता. 26 आणि 27 ऑगस्टची रात्र आमच्यासाठीही जीवघेणीच होती. केवळ आशुतोषची चिंता लागली होती. वारंवार फोन करूनही फोन लागत नव्हता. पण जेव्हा 28 ऑगस्ट रोजी अचानक आशुतोषचा फोन आला, तेव्हा त्यांचा आवाज ऐकून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आशुतोष सुखरूप असल्याची खात्री पटली, असे आशुतोष यांचे वडील विनोद उपाध्याय यांनी सांगितले. Nepal flood survivor story
फोटो पाहून काळजात धस्स
आशुतोष यांचे वडील 75 वर्षांचे आहेत. नेपाळच्या पुराचे फोटो আणি व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून आमच्या काळजात धस्स होत होते. यात आपला मुलगा तर नाही ना, ही शंका मनात येत होती. मनात पाल चुकचुकत होती. पण जेव्हा आशुतोषशी बोलणे झाले, तेव्हा आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला, असे विनोद उपाध्याय यांनी सांगितले. नेपाळचा महापूर महाभयानक होता. देवाने कुणावरही ही वेळ आणू नये, असे ते म्हणाले.
Nepal flood survivor story संदर्भातील महत्त्वाचे तपशील या वृत्तात दिले आहेत.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates