नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Navnath Ban MPSC protest संदर्भातील पुणे : पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सध्या राजकारण तापले असून, या आंदोलनाबाबत भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुण्यातील MPSC आंदोलनातील काही युवक आणि काँग्रेसच्या युवक नेत्यांवर ‘नाईट लाईफ’ एन्जॉय करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आंदोलनादरम्यान धांगडधिंगा सुरू असून आंदोलनातील युवक रात्रीच्या वेळी मौजमजा करत आहेत, असा दावा करत नवनाथ बन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओच्या माध्यमातून युवा काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप करण्यात आले होते. ‘युवक आंदोलनातील नेता रस्त्यावर उतरून मुलीसोबतच्या व्यक्तीशी वाद घागत आहे, रोहित पवार हीच तुमची नाईट लाईफ आहे का?’ असा थेट सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केला होता. या सर्व प्रकरणानंतर आता संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी स्वतः माध्यमांसमोर आली असून तिने नवनाथ बन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याउलट, शिवराज मोरे यांनी आपल्याला संकटाच्या काळात मदत केल्याचे सांगत त्यांनी आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अनुक्रमणिका
तरुणीचा माध्यमांसमोर गौप्यस्फोट, नवनाथ बन यांचे आरोप फेटाळले – Navnath Ban MPSC protest
नवनाथ बन यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि खळबळजनक आरोप झाल्यानंतर, संबंधित व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीने युवा काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिने घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. माध्यमांसमोर बोलताना संबंधित तरुणीने सांगितले की, नवनाथ बन यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत. मी तो व्हिडिओ बघितला आहे, परंतु नवनाथ बन यांना या प्रकरणाची कोणतीही वस्तुस्थिती माहीत नाही. मी त्यावेळी ज्या कठीण प्रसंगाला सामोरे जात होते, त्याचे चुकीचे चित्रण केले जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे माझे थेट ‘कॅरेक्टर अॅसिनेशन’ (चारित्र्यहनन) करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. शिवराज मोरे हे माझ्यासाठी भावासारखे आहेत, असे स्पष्टीकरण या तरुणीने दिले. Navnath Ban MPSC protest संदर्भातील माहिती येथे दिली आहे. Navnath Ban MPSC protest
आपल्यावरील बिकट परिस्थितीबद्दल बोलताना तरुणी म्हणाली की, त्यावेळी एक मुलगा मला सतत त्रास (हॅरॉस) करत होता आणि ब्लॅकमेल करत होता. याच काळात मी शिवराज दादांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. माझ्या मदतीसाठी शिवराज मोरे आणि त्यांचे काही मित्र धावून आले होते, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते, असे सांगत तिने नवनाथ बन यांचे आरोप खोडून काढले. Navnath Ban MPSC protest संदर्भातील माहिती येथे दिली आहे.
शिवराज मोरेंचा नवनाथ बन यांच्यावर जोरदार पलटवार – Navnath Ban MPSC protest
तरुणीच्या पत्रकार परिषदेत युवा काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी देखील नवनाथ बन यांच्यावर तीव्र शब्दांत पलटवार केला. मागील २ तारखेपासून आम्ही पुण्यात सत्याग्रह आंदोलन करत आहोत आणि यादरम्यान अनेक लोकांकडून आमच्यावर विविध आरोप केले जात आहेत, असे मोरे म्हणाले. नवनाथ बन यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.
मी एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधात लढणारा सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगत त्यांनी घटनेमागील वास्तव समोर आणले. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी माझ्या एका मित्राची बहीण आहे. तिचा तो मित्र सध्या हैदराबाद येथे नोकरी किंवा कामानिमित्त असतो. त्याने मला फोन करून सांगितले होते की, एका मुलाकडून त्याच्या बहिणीला त्रास दिला जात असून तिला मारहाणही करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती देताना शिवराज मोरे म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी नाशिक येथे होतो. त्यानंतर ती मुलगी आणि तिची आई मला भेटण्यासाठी आले होते. मी तात्काळ त्यांना एक वकील उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या माध्यमातून पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांसमोर जवळपास ३ तास त्या मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आला आणि नंतर लेखी तक्रार घेतली गेली.
पोलिसांनी त्या त्रास देणाऱ्या मुलाला देखील पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यानंतर ती मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत जेवण्यासाठी बाहेर गेली असता, तोच मुलगा तिथेही पोहोचला आणि त्याने रस्त्यात तिला पुन्हा अडवले. यावेळी ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि रडत होती, असा संपूर्ण घटनाक्रम शिवराज मोरे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केला.
माझ्याकडे सगळे पुरावे आणि कागदपत्रे उपलब्ध – शिवराज मोरे
आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना शिवराज मोरे यांनी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा केला. पोलिसांनी माझे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) देखील काढले होते, परंतु माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा गुन्हा दाखल नसताना माझा CDR कसा काढण्यात आला, असा सवाल त्यांनी केला. त्यादिवशी जे मित्र त्या मुलीला मदत करण्यासाठी माझ्यासोबत आले होते, त्यांनाही जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणि भक्कम पुरावे आहेत, ज्यातून त्या मुलाने कशा प्रकारे त्रास दिला हे सिद्ध होते. एका मुलीला मदत करणे हे माझे कर्तव्यच होते.
विशेष म्हणजे, ज्या मुलाने त्रास दिला तो अमली पदार्थांचे सेवन करतो आणि माझ्याकडे त्याचे फोटो देखील उपलब्ध आहेत, असा दावा मोरे यांनी केला. मग या सर्व परिस्थितीला ‘नाईट लाईफ’ कसे काय म्हटले जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. Navnath Ban MPSC protest
आंदोलन दाबण्यासाठी राजकीय विरोधकांचा डाव
नवनाथ बन यांच्या भूमिकेवर कडाडून टीका करताना शिवराज मोरे म्हणाले की, एका संकटात सापडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो तर यात काय चुकीचे आहे? यावरून माझ्यावर नशा केल्याचा धादांत खोटा आरोप लावला गेला. ज्या दिवशी हा सर्व प्रकार घडला, त्या दिवशी मी सकाळी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होतो आणि माझे त्यावेळचे फोटो देखील उपलब्ध आहेत.
जर मी ड्रग्सचे सेवन केले असते, तर मी आंदोलनात कसा सहभागी झालो असतो? हे आंदोलन दाबून टाकण्यासाठीच हे सर्व षडयंत्र रचले जात आहे आणि यात भाजपचे लोक सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून, मी उपोषणाला बसलो असताना सतत सर्वांसमोर आहे. हे सुरू असलेले आंदोलन मोडीत काढण्यासाठीच हा सर्व केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. Navnath Ban MPSC protest
पुढे बोलताना शिवराज मोरे यांनी थेट इशारा दिला की, ‘नवनाथ बन आमचा नाद करू नकोस, आमची पोरं तुझ्या मागे लागली तर तुला रोजंदारी करावी लागेल.’ आम्ही पूर्णपणे गांधीवादी मार्गाने शांततेत लढा देत आहोत आणि मी कोणालाही कोणतीही धमकी देत नाहीये. परंतु, अशा प्रकारे खोट्या गोष्टी आणि नरेटिव्ह कसे तयार केले जाऊ शकतात? भाजपचे लोक सतत माझ्यावर वॉच ठेवून आहेत.
वास्तविक पाहता, संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात नेमके ड्रग्स कुठून आणि कसे येते? असा थेट सवाल त्यांनी शासन-प्रशासनाकडे विचारला. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणार, याच कारणामुळे आमच्यावर अशा प्रकारे जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, असा दावाही शिवराज मोरे यांनी शेवटी केला.
Navnath Ban MPSC protest संदर्भातील महत्त्वाचे तपशील या वृत्तात दिले आहेत.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates