Mira Bhayandar Crime News: मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्…, गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
Mira Bhayandar Crime News संदर्भातील मीरा-भाईंदर : पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा प्रवेश करून रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका शिकारी पथकात मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जंगलात अंधारात प्राण्याचे डोळे चमकल्याचा गैरसमज झाल्याने झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मोठी दंतकथा रचत मृतदेहाचे शवविच्छेदन न करता आणि पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अत्यंत संशयास्पदरित्या पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकरणाने मीरा-भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वन्यजीव संरक्षण आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अनुक्रमणिका
- Mira Bhayandar Crime News: अंधारात डोळे चमकले अन्… छातीत गोळी लागल्याने मृत्यू
- Mira Bhayandar Crime News: स्फोटकाचा बनाव आणि दडपशाहीचा प्रयत्न
- Mira Bhayandar Crime News: खोटे मृत्यू प्रमाणपत्र आणि अंत्यसंस्काराची घाई
- Mira Bhayandar Crime News: वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आणि पोलिसांची कारवाई
- Mira Bhayandar Crime News: पोलिसांची सविस्तर भूमिका
Mira Bhayandar Crime News: अंधारात डोळे चमकले अन्… छातीत गोळी लागल्याने मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या प्राधिकृत माहितीनुसार, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी चेना गाव परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण सात जणांचे पथक रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने गेले होते. या पथकामध्ये महेश अनंत गायकर, विजय सुखरू सापटे, कल्पेश बंडू डगला, कुणाल प्रभाकर शेलार, काठोड बिस्तूर लाबड, प्रविण बाळू जाधव आणि मयत विजय यांचा मुलगा रोहित सापटे यांचा समावेश होता. बेकायदा शिकारीसाठी या सर्वांच्या पासल बंदुका, छरे आणि इतरघातक साहित्य होते. मध्यरात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान या सर्व जणांनी जंगलात गेल्यानंतर दोन स्वतंत्र गट केले. जंगलात बॅटरीच्या आणि मोबाईलच्या प्रकाशात शिकार शोधण्याचे काम सुरू असताना अंधारात एका प्राण्याचे डोळे चमकत असल्याचा भास झाला. याच गैरसमजातून महेश गायकर याने त्या दिशेने अचानक गोळीबार केला.
या दुर्दैवी गोळीबारामध्ये विजय सुखरू सापटे (वय 60, रा. बेलखडी पाडा, चेना गाव) यांच्या छातीत थेट गोळी लागल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत विजय सापटे हे मीरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत होते. या गोळीबाराच्या घटनेमध्ये कुणाल शेलार आणि कल्पेश ढगळा हे दोघे जण देखील गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाच्या मांडीला, तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागल्याचे समोर आले आहे. या दोन्ही जखमींवर सध्या काशीगाव येथील आशिष रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mira Bhayandar Crime News: स्फोटकाचा बनाव आणि दडपशाहीचा प्रयत्न
या अत्यंत गंभीर घटनेची माहिती एका सजग समाजसेवकाने प्रशासनाला दिल्यानंतर काशिगाव पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जखमींनी आणि संशयितांनी नदीच्या पाण्यात स्फोटक टाकून मासेमारी करताना स्फोट झाला आणि अंगात छरे घुसल्यामुळे ही दुखापत झाल्याची बनावट कहाणी रचली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तेथे रक्ताचे डाग आणि झाडांवर गोळीबाराचे स्पष्ट मार्क्स आढळून आले. सुरुवातीला सांगितलेली खोटी माहिती आणि घटनास्थळावरील वास्तव परिस्थिती यामधील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी कसून चौकशीचा बडगा उगारला. Mira Bhayandar Crime News
Mira Bhayandar Crime News: खोटे मृत्यू प्रमाणपत्र आणि अंत्यसंस्काराची घाई
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब म्हणजे, डॉ. राजेश पांलाडे यांनी प्रत्यक्षात मृतदेह न बघता केवळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मयताला बघून, विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू घरी नैसर्गिकरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे खोटे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले. नियमानुसार अशा अपघाती किंवा संशयास्पद मृत्यूची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असतानाही ती जाणीवपूर्वक लपवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजेश पांलाडे हे शिवसेना शिंदे गटाशी जवळीक असलेले डॉक्टर आहेत. भाईंदरमधील त्यांचे आशिष मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे शिवसेना वैद्यकीय विभाग, मीरा-भाईंदर जिल्हा याच्याशी संलग्न असून ते डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि वैद्यकीय पात्रता म्हणून ते होमिओपॅथीमध्ये एम.डी. आहेत.
मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे भासवून संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. विजय सापटे यांच्या मृत्यूची कोणतीही वाच्यता पोलिसांत न करता आणि कुठल्याही प्रकारचे शवविच्छेदन न करता कुटुंबीय व सहकाऱ्यांनी पहाटेच मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून टाकले. याप्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणे, पुरावे नष्ट करणे आणि बेकायदा शिकार केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर राजेश पांलाडे यांच्यासह इतर सहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काशिगाव पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपी महेश गायकर आणि काठोड बिस्तूर लाबड यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडे असणाऱ्या तीन ठासणीच्या बंदुकांपैकी एक बंदूक पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित हत्यारांचा कसून शोध घेतला जात आहे. या बंदुका बाळगण्यासाठी त्यांच्याकडे कायदेशीर परवाना (लायसन्स) होता का, यादृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मयत विजय सापटे यांच्या पत्नीने या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता पतीच्या जागेवर त्यांच्या मुलाला महानगरपालिकेत नोकरी देण्यात यावी, अशी आर्त मागणी केली आहे.
Mira Bhayandar Crime News: वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आणि पोलिसांची कारवाई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेच्या आणि नैसर्गिक संपदेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि संरक्षित वनक्षेत्र आहे. अशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि प्रतिबंधित परिसरात बेकायदा प्रवेश करून प्राणघातक शस्त्रांच्या साहाय्याने शिकार करण्याचा हा प्रकार समोर आल्याने जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिकारीसाठी अशा प्रकारे गावठी व ठासणीच्या बंदुकांचा बेधडक वापर होत असल्यास केवळ वन्यजीवांचेच नव्हे, तर जंगलात अथवा आजूबाजूला वावरणार्या सामान्य नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणात सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांखाली कायदेशीर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. याशिवाय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून देखील वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्रपणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्र Hकडून देण्यात आली आहे. Mira Bhayandar Crime News
Mira Bhayandar Crime News: पोलिसांची सविस्तर भूमिका
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना डीसीपी झोन-1 चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “मिरा-भायंदरमधील चेना गावातील सात जण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या संरक्षित वनक्षेत्रामध्ये प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना हवी तशी शिकार मिळाली नाही, आणि तिथून परत येत असताना ते दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये चालत होते. त्यातील एका ग्रुपमधील व्यक्तीने मोबाईलचा टॉर्च सुरू केला, ज्यामुळे मुख्य आरोपी महेश गायकर याला असे वाटले की तिथे प्राण्यांची काहीतरी हालचाल सुरू आहे. याच गैरसमजातून त्याने त्या दिशेने थेट गोळीबार केला.
गोळीबारामुळे विजय सापटे यांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या. त्यानंतर या सहाही जणांनी मिळून मृतदेह चेना गावात आणला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेले डॉक्टर राजेश पालांडे यांनी मृताची कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता विजय सापटे यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने (हृदयविकाराच्या झटक्याने) झाला आहे, असे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जारी केले. या सर्वांनी संगनमताने मृतदेह जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एकूण सहा व्यक्ती आणि डॉक्टर राजेश पालांडे अशा सात जणांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, झाडांवर उमटलेले छऱ्यांचे निशाण आणि काही छरे आम्ही जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली असून एक ठासणीची बंदूक हस्तगत करण्यात आली आहे.” Mira Bhayandar Crime News
पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. मयताचा मुलगा आणि डॉक्टर या दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे, परंतु त्यांच्या भूमिकेबाबतच्या संशयास्पद बाबी व तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाईल. जप्त करण्यात आलेली बंदूक आणि उर्वरित बंदुका त्यांनी कुठून आणल्या, त्यांना त्याचे अधिकृत परवाने होते की नाही, या सर्व बाबी तपासात निष्पन्न केल्या जातील.”
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates