Skip to content

Become an ANN Reporter

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name *
Reporter Type
Journalism Experience
मी दिलेली सर्व माहिती खरी असून ACCURATE NEWS NETWORK च्या नियमांचे पालन करण्यास सहमत आहे. *
Loading
Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN

Truth First | Fast & Accurate Reporting

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN

Truth First | Fast & Accurate Reporting

  • मुख्यपृष्ठ
  • आंतरराष्ट्रीय
  • भारत
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • विदर्भ (वऱ्हाड)
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • राजकारण
  • महानगर
    • मुंबई
    • पुणे
    • नाशिक
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • E-Paper
  • ANN Special Story
Close

Search

Trending Now:
Breaking News Maharashtra News India News Mumbai News Sports News Agriculture News ANN NEWS
  • मुख्यपृष्ठ
  • आंतरराष्ट्रीय
  • भारत
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • विदर्भ (वऱ्हाड)
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • राजकारण
  • महानगर
    • मुंबई
    • पुणे
    • नाशिक
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • E-Paper
  • ANN Special Story
WhatsApp Updates
Home/क्राईम/Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?
Ketan Agwarwal murder - Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?
क्राईमपश्चिम महाराष्ट्रपुणे

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?

By Accurate News Network - ANN
15.09.2026 4 Min Read

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तिसरी अटक, पोलिसांच्या जाळ्यात रितेश हिंगे – Ketan Agwarwal murder

Ketan Agwarwal murder पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agwarwal) हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वाची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक करून तपासाला नवी दिशा दिली आहे. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती आणि दोघेही सध्या तुरुंगात आहेत. आता मात्र या प्रकरणात तिसऱ्या आरोपी म्हणून रितेश हिंगे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रितेश हा मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनुक्रमणिका

  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तिसरी अटक, पोलिसांच्या जाळ्यात रितेश हिंगे – Ketan Agwarwal murder
  • रितेश हिंगेला आधीच होती कटाची माहिती – Ketan Agwarwal murder
  • लोहगडावर येण्यास रितेशने दिला नकार
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
  • साखरपुड्याच्या आधीच रचला होता कट
  • तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उघडकीस आले सत्य

लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता तिसऱ्या आरोपीच्या अटकेने या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. Ketan Agwarwal murder संदर्भातील माहिती येथे दिली आहे.

रितेश हिंगेला आधीच होती कटाची माहिती – Ketan Agwarwal murder

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हिंगे याला केतन अग्रवाल याच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती, असा दृढ संशय पोलिसांना आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाच्या आधारावर त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केले होते. मात्र, पोलिसांनी ते रिकव्हर केल्यानंतर तपासात महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या डिलीट केलेल्या संभाषणातून हत्येच्या कटाची संपूर्ण माहिती रितेशला दिल्याचे पुरावे समोर आले आहेत. Ketan Agwarwal murder संदर्भातील माहिती येथे दिली आहे.

लोहगडावर येण्यास रितेशने दिला नकार

आरोपी चेतन चौधरी याने त्याच्या मित्र रितेश याला हत्येच्या कटाची माहिती दिली होती, असा पोलिसांना संशय आहे. एवढेच नव्हे तर 18 जून रोजी, ज्या दिवशी केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी त्यांच्या मित्र रितेशला लोहगडावर सोबत येण्यास सांगितले होते. मात्र त्याने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. हत्येनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपर्काच्या आधारावर पोलिसांनी रितेशला या प्रकरणात सामील असल्याचा संशय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत आहे. न्यायालयाने रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रितेशच्या अटकेने या प्रकरणात अधिक नावे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, तपासादरम्यान केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी कट रचून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

घटनेनंतर आरोपींनी केतनचा घसरून अपघाती मृत्यू झाल्याचे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांची पडताळणी करत कसून चौकशी केली. त्यातून या घटनेमागचे धक्कादायक सत्य हळूहळू समोर आले. केतन अग्रवाल याचा मृत्यू अपघात नसून, पूर्वनियोजित कटातून करण्यात आलेली हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

साखरपुड्याच्या आधीच रचला होता कट

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यास ते एकमेकांसोबत आनंदी आणि परफेक्ट कपल असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, पोलिसांच्या तपासानुसार, पडद्यामागे वेगळीच कहाणी सुरू होती. सिया ही तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत केतनला संपवण्याचा कट रचत असल्याचे तपासातून समोर आले.

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याचा मृत्यू होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीही सियाने त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. मात्र, त्यावेळी तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा केतनला किल्ल्यावरील उंच ठिकाणी नेऊन खाली ढकलण्यात आले, असा आरोप आहे.

Ketan Agwarwal murder - Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?
Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उघडकीस आले सत्य

या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा मोठा वापर केला. कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप संभाषणे आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारावर तपास पूर्व केला. रितेशने डिलीट केलेले व्हॉट्सॲप संभाषण पोलिसांनी रिकव्हर केले. यातून तीन आरोपींमधील संबंध आणि हत्येच्या कटाची संपूर्ण माहिती उघडकीस आली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आता तिसऱ्या अटकेने हा कट अधिक गुंतागुंतीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणात अजूनही इतर कोणाचा सहभाग असू शकतो का, हे तपासले जत आहे. रितेश हिंगे याच्या पोलिस कोठडीतून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ketan Agwarwal हत्या प्रकरणी अधिक धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ketan Agwarwal murder संदर्भातील महत्त्वाचे तपशील या वृत्तात दिले आहेत.

अधिकृत माहिती
Pune Police official website
संबंधित अधिकृत माहिती पाहा ↗
अधिकृत माहिती
Maharashtra Police official website
संबंधित अधिकृत माहिती पाहा ↗
संबंधित ANN बातमी
Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकार दरबारी मोठ्या हालचाली, काय मोठी अपडेट?
Accurate News Network मधील संबंधित बातम्या वाचा →
Accurate News Network - ANN
Accurate News Network - ANN

ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting

🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.

ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:

✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on X (Opens in new window) X
  • Email a link to a friend (Opens in new window) Email
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Print (Opens in new window) Print

🔴 LIVE TV

LIVE
Advertisement

Trending Topics

HOT
#क्रीडा#आंतरराष्ट्रीय#मनोरंजन#ब्रेकिंग न्यूज#मुंबई#भारत#क्राईम#कृषी वार्ता

📈 शेअर बाजार LIVE

NIFTY 50Loading…
SENSEXLoading…
NIFTY BANKLoading…
Live update

🌦 Weather + AQI LIVE

Loading…हवामान अपडेट होत आहे…
Mumbai · AQI —

🔴 LIVE

CricketLive score loading…Fixtures & match status updating

Social Updates

LIVE

Facebook

LIVE

Instagram

LIVE
Feed उपलब्ध नाही. Dashboard मधून credentials तपासा.
AdvertisementAdvertisement

Like this:

Like Loading…

Related

Tags:

Chetan ChaudhariKetan Agwarwal murderLohagad fort deathPune murder casePune rural policeRitesh Hinge arrestSiya Goyal arrestVishal Agwarwal
Author

Accurate News Network - ANN

ANN – Accurate News Network 🟥 Truth First | Fast & Accurate Reporting 🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर. ANN – Accurate News Network घेऊन येत आहे: ✔ Breaking News ✔ Political Updates ✔ Crime Reports ✔ Social & Viral Stories ✔ Entertainment & Sports ✔ Ground Reporting ✔ Live Updates

Follow Me
Other Articles
Priyanka Barve photoshoot - Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा
Previous

Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा

Nanded Totamba Ghat Accident four devotees killed six injured
Next

सहस्रकुंडहून परतताना काळाचा घाला; तोटंबा घाटात जीप अपघातात 4 भाविकांचा मृत्यू

No Comment! Be the first one.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

Hi, I'm Pradnyawant , News Editor at Accurate News Network (ANN)
  • X
  • Instagram
  • Facebook
  • युटयूब
Work Experience

ANN Media

Full-Time Blogger

2022-present

QC Pen

Content Writer

2019-2021

Blog ANN Weekly

Guest Blogger

2017-2019

Available for Hire
Get In Touch

Latest Posts

  • IPL Trade News : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर!; पंजाब किंग्समध्ये एन्ट्री, अर्शदीप सिंह मुंबईमध्ये सामील
  • Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक
  • Saif Ali Khan Death Threat : सैफ अली खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! झिशान अख्तरच्या नावाने धमकीचा संदेश
  • Maharashtra Epstein Files Movie Controversy : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद; नावाविरोधात खंडपीठात याचिका
  • Deven Bharti : मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

Contact Us

Phone

+91 8999692018

Email

admin@accuratenewsnetwork.in

editor@accuratenewsnetwork.in

Location

Mumbai,Maharashtra

Quick Link

  • About Us
  • Contact Us
  • Editorial Policy
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms & Conditions

अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारितेसाठी समर्पित डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि विशेष वृत्तांचे निष्पक्ष व सखोल कव्हरेज आम्ही 24x7 आपल्या सेवेत उपलब्ध करून देतो.

  • https://www.facebook.com/AccurateNewsNetwork
  • https://x.com/annnetwork_in
  • https://www.instagram.com/accuratenewsnetwork.in/
  • https://www.youtube.com/@AccurateNewsNetwork_In

Accurate News Network - ANN

© 2026 Accurate News Network - ANN. All Rights Reserved. Designed & Managed by ANN Digital Media.
Loading Comments...
%d

    ANN – Accurate News Network

    Truth First | Fast & Accurate Reporting

    अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारितेसाठी समर्पित डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष वृत्तांचे निष्पक्ष व सखोल कव्हरेज आम्ही 24x7 आपल्या सेवेत उपलब्ध करून देतो.

    FacebookInstagramYouTubeXWhatsApp

    Quick Links

    • मुख्यपृष्ठ
    • E-Paper
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer

    Contact

    Phone+91 8999692018
    Emaileditor@accuratenewsnetwork.in
    LocationMumbai, Maharashtra
    © 2026 Accurate News Network - ANN. All Rights Reserved. Designed & Managed by ANN Digital Media.