Dhule UMED Campaign Complaint : धुळे उमेद अभियानावर गंभीर आरोप; मशीनरी खरेदीपासून महिलांच्या मानधनापर्यंत स्वतंत्र चौकशीची मागणी
धुळे उमेद अभियानावर गंभीर आरोप; मशीनरी खरेदी, निधी आणि महिलांच्या मानधनाची चौकशी करण्याची मागणी -Dhule UMED Campaign Complaint
धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या धुळे जिल्ह्यातील कामकाजाबाबत गंभीर प्रशासकीय व आर्थिक आरोप करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरावरील यंत्रणेपासून स्वतंत्र अशा वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत राज्यस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सौ. भारती माळी, महिला प्रतिनिधी व तक्रारदार यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद अभियान, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, लोकायुक्त तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गंभीर निवेदन सादर केले आहे.
तक्रारीनुसार, उमेद अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण हा आहे. महिलांना रोजगार व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र धुळे जिल्ह्यात अभियानाच्या अंमलबजावणीदरम्यान काही अधिकारी व संबंधित व्यक्तींच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर यापूर्वी तक्रारी करूनही अपेक्षित आणि निष्पक्ष कारवाई झाली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
मशीनरी खरेदीच्या दरावर प्रश्नचिन्ह
उमेद अभियानांतर्गत महिलांच्या उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मशीनरीच्या खरेदी प्रक्रियेवर निवेदनात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मशीनरीची किंमत, निविदा प्रक्रिया, पुरवठा, दर्जा, बिल, देयके आणि प्रत्यक्ष लाभार्थी याबाबत स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
तक्रारदारांच्या आरोपानुसार, काही मशीनरीची किंमत प्रत्यक्ष बाजारातील उपलब्ध किंमतीपेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त दाखवण्यात आल्याचा संशय आहे. उदाहरण म्हणून सुमारे १५ लाख रुपये किंमत दर्शविण्यात आलेली मशीनरी प्रत्यक्षात सुमारे ६ लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी निविदा, तुलनात्मक दरपत्रके, मंजूर रक्कम, प्रत्यक्ष देयके आणि बाजारभाव यांची आर्थिक व तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय संबंधित मशीनरी प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना मिळाली आहे का, तिची गुणवत्ता आणि क्षमता निविदेतील तपशीलाप्रमाणे आहे का, स्टॉक रजिस्टरमध्ये नोंद आहे का आणि मशीनरीचा पंचनामा करण्यात आला आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी आहे. Dhule UMED Campaign Complaint
मशीनरीची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी
कागदोपत्री मशीनरी दाखवून प्रत्यक्षात ती उपलब्ध नसणे, कमी दर्जाची किंवा वेगळी मशीनरी देणे अथवा एकाच मशीनरीचा अनेक ठिकाणी वापर दाखविणे अशा प्रकारच्या अनियमितता झाल्या आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वतंत्र अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रत्येक मशीनरीचा फोटो, व्हिडिओ, मशीन नंबर, कंपनीचे नाव, मॉडेल, खरेदी किंमत, लाभार्थी, स्टॉक नोंद आणि सध्याचे स्थान यांचा स्वतंत्र अहवाल तयार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशिक्षणाच्या आयोजनावरही सवाल Dhule UMED Campaign Complaint
उमेद अभियानांतर्गत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणांची प्रत्यक्ष स्थिती तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशिक्षण प्रत्यक्ष झाले होते का, किती महिला उपस्थित होत्या, प्रशिक्षक कोण होते, प्रशिक्षणाचा कालावधी किती होता आणि त्यासाठी किती निधी मंजूर व खर्च करण्यात आला, याची पडताळणी करण्याची मागणी आहे.
उपस्थितीपत्रक, प्रशिक्षणाचे फोटो-व्हिडिओ, बिल आणि देयके तपासून प्रत्यक्ष प्रशिक्षण न घेता कागदोपत्री प्रशिक्षण दाखवण्यात आले आहे का, हे निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
महिला बचत गटांच्या निधीचा हिशेब मागितला
सन २०१८-१९ पासून आजपर्यंत महिला बचत गटांची निर्मिती, त्यांची कार्यरत स्थिती, गटांना मिळालेला निधी आणि निधीचा वापर याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले गट किती, केवळ कागदोपत्री गट किती, प्रत्येक गटाला किती निधी मिळाला, निधी कोणत्या खात्यात जमा झाला आणि त्याचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा तपशील तपासण्याची मागणी आहे. संबंधित बिले, व्हाउचर आणि लाभार्थी महिलांना प्रत्यक्ष मिळालेल्या लाभाची बँक व्यवहारांसह पडताळणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
FR आणि IFC अंतर्गत खरेदीची चौकशी
महिला गटांना उपलब्ध झालेल्या FR आणि IFC अंतर्गत निधीतून करण्यात आलेल्या खरेदीचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक खरेदीसाठी मंजुरी, मागणीपत्र, कोटेशन, निविदा किंवा खरेदी प्रक्रिया, बिल, व्हाउचर, बँक व्यवहार, पुरवठादार, साहित्य आणि प्रत्यक्ष लाभार्थी यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभात संघाच्या निधीवरही प्रश्न
प्रभात संघाच्या माध्यमातून झालेल्या निधी वितरण आणि खरेदी प्रक्रियेची स्वतंत्र आर्थिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघाला किती निधी प्राप्त झाला, तो कोणत्या कारणासाठी मंजूर करण्यात आला, खरेदी कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेमार्फत झाली, किती रक्कम खर्च झाली आणि प्रत्यक्ष लाभार्थींना काय मिळाले, याचा संपूर्ण तपशील तपासण्याची मागणी आहे. Dhule UMED Campaign Complaint
सीआरपी, कृषी सखींच्या मानधनातील कपातीची चौकशी
सीआरपी, कृषी सखी आणि इतर महिला कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या मानधनातून अनधिकृत कपात झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंजूर मानधन, प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम, कपात झाल्यास त्याचे कारण, उपस्थिती, कामाचा अहवाल आणि बँक स्टेटमेंट यांची तुलना करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
सीआरपी आणि कृषी सखींच्या भरती प्रक्रियेवरही सवाल Dhule UMED Campaign Complaint
सन २०१८-१९ पासून आजपर्यंत सीआरपी आणि कृषी सखी यांच्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जाहिरात काढण्यात आली होती का, निवड कोणत्या नियमांनुसार झाली, निवड समिती कोण होती आणि निवड झालेल्या व्यक्तींची पात्रता काय होती, याची चौकशी करण्याची मागणी आहे. याशिवाय आतापर्यंत किती सीआरपी बदलल्या, किती व्यक्तींना कामावरून कमी करण्यात आले, त्यामागील कारणे काय होती आणि त्यांचे कामाचे अहवाल व मानधनाचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलांवर दबाव आणि धमकीचा आरोप
गैरप्रकारांविरोधात आवाज उठवल्यानंतर तक्रारदार महिलांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही संबंधित व्यक्तींकडून महिलांना धमकीवजा वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, “तुमच्याकडून आमचे काही होऊ शकत नाही” तसेच “दोन महिन्यांनंतर तुम्हाला आम्ही बघून घेऊ” अशा स्वरूपाची वक्तव्ये करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
महिलांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप Dhule UMED Campaign Complaint
तक्रारदार महिलांना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तुच्छतेची आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महिलांच्या तक्रारींची दखल न घेता त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिलांच्या सन्मानाशी संबंधित या आरोपांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वतंत्र दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
CEO यांच्या आश्वासनानंतरही कारवाई न झाल्याचा दावा
या प्रकरणाबाबत धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबत तोंडी आश्वासन देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या संभाषणाचे कॅमेरा किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. मात्र त्यानंतरही संबंधित अधिकारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला असून, CEO यांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कारवाई का झाली नाही, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशीची कागदपत्रे संबंधित व्यक्तींच्याच ताब्यात?
निवेदनातील आणखी एका गंभीर मुद्द्यानुसार, श्री. राजन पाटील यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणात मनुष्यबळ कमी असल्यामुळे संबंधित व्यक्तींवर तत्काळ कारवाई करणे किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच चौकशीसाठी आवश्यक फाईल्स आणि कागदपत्रे संबंधित व्यक्तींनी कार्यालयातील कपाटात ठेवली असून ती कागदपत्रे त्यांनाच माहिती आहेत आणि तेच कपाटातून काढून देतील, अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीपूर्वी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे स्वतंत्र अधिकाऱ्याच्या ताब्यात घेऊन सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
CCTV, डिजिटल रेकॉर्ड आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची मागणी
मूळ फाईल्स, मंजुरी आदेश, निविदा कागदपत्रे, कोटेशन, खरेदी आदेश, बिले, व्हाउचर, स्टॉक रजिस्टर, मशीनरी नोंदी, लाभार्थी याद्या, प्रशिक्षण नोंदी, उपस्थितीपत्रके, बँक व्यवहार, मानधन नोंदी, सीआरपी व कृषी सखींचे अहवाल, डिजिटल रेकॉर्ड, ई-मेल आणि CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशी सुरू होण्यापूर्वीच कागदपत्रे गहाळ, बदलली किंवा नष्ट होण्याचा धोका असल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व रेकॉर्डचा स्वतंत्र पंचनामा किंवा इन्व्हेंटरी करून ते वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ताब्यात ठेवावेत, अशी मागणी आहे.
महिलांची बदनामी केल्याचाही आरोप Dhule UMED Campaign Complaint
गैरप्रकारांविरोधात तक्रार केल्यानंतर काही व्यक्तींमार्फत गावोगावी महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महिलांनी पैसे घेतल्याचे खोटे आरोप करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे तक्रार मागे घेण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव निर्माण होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या बाबीचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलांच्या सुरक्षेची मागणी Dhule UMED Campaign Complaint
तक्रारदार महिला, साक्षीदार आणि संबंधित व्यक्तींवर कोणताही दबाव, धमकी, बदनामी, नोकरी किंवा मानधनाशी संबंधित प्रतिशोध अथवा अन्य प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वतंत्र राज्यस्तरीय चौकशीची ठाम मागणी
या संपूर्ण प्रकरणाची धुळे जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, मशीनरी खरेदीची आर्थिक व तांत्रिक तपासणी करावी, प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, प्रशिक्षणांची पडताळणी करावी आणि महिला बचत गटांना मिळालेल्या निधीचा बँक व्यवहारांसह तपास करावा, अशा एकूण २० मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.याशिवाय सीआरपी व कृषी सखींच्या भरती, बदल, कामाचे अहवाल आणि मानधनाची चौकशी, महिलांच्या मानधनातील कथित कपातीची तपासणी, धमकी व अपमानास्पद वर्तनाची चौकशी, उपलब्ध ऑडिओ-व्हिडिओ पुराव्यांची आवश्यकता असल्यास फॉरेन्सिक तपासणी आणि दोष अथवा आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास नियमानुसार विभागीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. Dhule UMED Campaign Complaint
तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा संघर्ष उमेद अभियानाच्या विरोधात नसून ग्रामीण महिलांना अभियानाचा लाभ पारदर्शकपणे मिळावा, सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि महिलांचा सन्मान अबाधित राहावा, हा उद्देश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ, कागदपत्रे, छायाचित्रे आणि इतर पुरावे चौकशी यंत्रणेसमोर सादर करण्यास तयार असल्याचेही तक्रारदारांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वेळबद्ध आणि स्वतंत्र चौकशी सुरू होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. Dhule UMED Campaign Complaint
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates