MPSC परीक्षा ऑनलाइन होणार? विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
MPSC परीक्षा ऑनलाइन होणार? विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावावरून राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना दिल्या आहेत.
पुण्यात सारथी संस्थेच्या वतीने आयोजित UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये यशस्वी उमेदवार व त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, एमपीएससीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र कोणताही निर्णय विद्यार्थ्यांवर लादला जाणार नाही. चर्चा आणि संवादातूनच योग्य निर्णय घेतला जाईल.
यावेळी त्यांनी खासगी स्पर्धा परीक्षा शिकवणी संस्थांनाही इशारा देत, या विषयावर विद्यार्थ्यांना दिशाभूल किंवा वेठीस धरू नये, असे आवाहन केले. हा विषय राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांचा विश्वास आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील.
यावेळी मराठा समाजासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा प्रस्तावाबाबत राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष आता आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






