मुंबई : उन्हाळा म्हटलं की कैरी, पन्हे, लोणचे आणि आंबट-गोड चवीची मजा आलीच. मात्र अनेकांना कैरी खाल्ल्यानंतर किंवा सोलल्यानंतर त्वचेवर पुरळ, खाज, सूज किंवा जळजळ यांसारख्या समस्या जाणवतात. विशेष म्हणजे यामागे कैरीचा गर नसून तिच्या सालीजवळील चिकट रस कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, कैरीच्या सालीमध्ये आणि देठाजवळील भागात असणाऱ्या काही रसायनांमुळे त्वचेवर अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
‘मंगोल’ रसायनामुळे होऊ शकते अॅलर्जी
कैरीच्या सालीमध्ये आणि चिकट रसामध्ये ‘मंगोल’ नावाचे रसायन आढळते. हे रसायन ‘उरुशियोल’सारखे असते, जे पॉयझन आयव्ही या विषारी वनस्पतीमध्ये आढळते. त्यामुळे काही लोकांना कैरीच्या संपर्कानंतर त्वचेवर रॅशेस आणि खाज येऊ शकते.
ही अॅलर्जी लगेच दिसून येत नाही. काही वेळा काही तासांनी किंवा 48 तासांनंतरही लक्षणे दिसू शकतात.
कैरीच्या या भागांमुळे वाढतो धोका
- कैरीची साल
- देठाजवळील भाग
- कैरी कापताना बाहेर येणारा चिकट रस
अॅलर्जीची लक्षणे कोणती?
- ओठांभोवती लाल पुरळ येणे
- त्वचेवर खाज आणि जळजळ
- ओठ किंवा डोळ्यांना सूज येणे
- हातावर छोटे पुरळ किंवा फोड येणे
- त्वचा कोरडी पडणे किंवा पापुद्रे निघणे
कोणाला जास्त धोका?
खालील समस्या असलेल्या लोकांना कैरीमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते:
- संवेदनशील त्वचा
- पॉयझन आयव्हीची अॅलर्जी
- काजू किंवा पिस्त्याची अॅलर्जी
अॅलर्जी झाल्यास काय करावे?
- प्रभावित भाग साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावा
- थंड पाण्याने शेक द्यावा
- सौम्य मॉइश्चरायझर वापरावे
- त्वचा खाजवणे टाळावे
- गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीहिस्टामाइन औषधे घ्यावीत
तज्ज्ञांच्या मते, कैरी खाताना किंवा सोलताना काळजी घेतल्यास अशा अॅलर्जी टाळता येऊ शकतात.

Leave a Reply