पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामातील अत्यंत खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स (MI) आपल्या संघात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सलग तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याला आपल्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचीही धक्कादायक माहिती (एक्सप्रेस स्पोर्ट्स ) च्या माध्यमातून समोर आली आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला १४ पैकी १० सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने संघ गुणतालिकेत थेट नवव्या स्थानावर गेला आहे. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलेले नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. यामुळे संघात मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू असून कर्णधारपदाची धुरा एका अनुभवी खेळाडूकडे सोपवली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


Leave a Reply