कर्नाटकात राजकीय भूकंप?

बंगळुरू: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरू आहे. या अंतर्गत संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या २८ मे म्हणजेच गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ते बुधवारी बेंगळुरूमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. तसेच, गुरुवारी त्यांनी आपल्या निवासस्थानी कॅबिनेट मंत्र्यांची एका ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ देखील आयोजित केली आहे.

दिल्लीतील मॅरेथॉन बैठका आणि काँग्रेसचा दावा

मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीनंतर काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बदलण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. या केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांबाबतच केवळ चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला.

पडद्यामागील खरी कहाणी काय?

काँग्रेसनं अधिकृतपणे नेतृत्वबदलाबाबत सस्पेन्स ठेवला असला, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सांभाळण्यास सांगितलं आहे. काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. सिद्धरामय्या यांना देशभरात ओबीसींचा मोठा चेहरा म्हणून पुढे आणण्याचा पक्षाचा विचार काँग्रेसचा आहे.

शिवकुमार यांच्या समर्थकांचा दावा

२०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वारंवार केला जात होता. आता काँग्रेस हायकमांडने शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतं.

Unknown's avatar

Accurate News Network (ANN)

ANN – Accurate News Network 🟥 Truth First | Fast & Accurate Reporting 🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर. ANN – Accurate News Network घेऊन येत आहे: ✔ Breaking News ✔ Political Updates ✔ Crime Reports ✔ Social & Viral Stories ✔ Entertainment & Sports ✔ Ground Reporting ✔ Live Updates

You may also like...

Leave a Reply

Discover more from ANN – Accurate News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading