‘सॅल्यूट सर!’ 20 वर्षांची तंबाखूची सवय सुटली; तरुणाने मानले तुकाराम मुंढेंचे आभार, पोस्ट व्हायरल
‘आई म्हणते मुंढे साहेबांचा फोटो घरात लावते’; सोशल मीडियावरील भावनिक पोस्टची चर्चा
नागपूर | प्रतिनिधी
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. अवैध गुटखा, तंबाखू आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधातील त्यांच्या कठोर मोहिमेमुळे अनेकांवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये संबंधित तरुणाने दावा केला आहे की, गेली 20 वर्षे असलेली तंबाखूच्या पुडीची सवय तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सुटली आहे. विशेष म्हणजे घरच्यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही हे व्यसन सुटले नव्हते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये तरुणाने लिहिले आहे, “सॅल्यूट सर… मी 20 वर्षांपासून पुड्या खातो. घरचे पाया पडले, शपथा घातल्या पण मी सोडली नाही. लहान भावाला तोंडाचा कर्करोग झाला तरी सवय सुटली नाही. पण आज पुड्या भेटत नाहीत म्हणून बंद झाल्यात.”
या पोस्टमध्ये पुढे त्याने नमूद केले आहे की, “आई म्हणते मुंढे साहेबांचा फोटो घरात लावते.” या एका वाक्याने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या असून सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव सुनील बावले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मुंढे यांच्या कारवाईचा प्रभाव
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यभरात शेकडो धाडी टाकत कोट्यवधी रुपयांचा अवैध गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला आहे. अनेक आस्थापना सील करण्यात आल्या असून संबंधित आरोपींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
मुंढे यांनी अवैध गुटखा आणि तंबाखू व्यवसाय करणाऱ्या संघटित टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक ठिकाणी अवैध विक्रीला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एका तरुणाचे दोन दशकांचे व्यसन सुटल्याचा दावा करणारी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अनेकजण तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत आहेत.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates