डिझेल, वेतन, विमा आणि देखभाल खर्च वाढल्याने निर्णय; जूनपासून नवे दर लागू
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. राज्यातील स्कूल बस आणि व्हॅनच्या भाड्यात सरासरी 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ जून 2026 पासून लागू करण्यात येणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर आर्थिक ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्रने भाडेवाढीची घोषणा केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, डिझेलचे वाढलेले दर, चालक व कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनांची देखभाल, विमा, टोल तसेच इतर ऑपरेशनल खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेणे अपरिहार्य बनले होते.
भाडेवाढ टाळण्यासाठी सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कोणतीही आर्थिक मदत किंवा सवलत मिळाली नसल्याचा दावा बस मालक संघटनेकडून करण्यात आला आहे.
या वाढीचा थेट परिणाम पालकांवर होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची मासिक बस फी 5 हजार रुपये असेल तर 15 टक्के वाढीनंतर त्यात सुमारे 750 रुपयांची भर पडणार आहे. काही भागांमध्ये प्रति किलोमीटर भाड्यातही 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय आधीच अडचणीत आला आहे. त्यातच टायर, स्पेअर पार्ट्स आणि वाहनांच्या देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे शालेय वाहतूक सेवा चालवणे कठीण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, पालकांनी या निर्णयाला सहकार्य करावे तसेच राज्य सरकारने शालेय वाहतूक क्षेत्रासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बस फी वाढल्याने पालकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार असून, या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या खर्चात वाढ होणार आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






