भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भाविका अहिरे
दोंडाईचा तालुक्याशी नाते असलेल्या कन्येची ऐतिहासिक कामगिरी; धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा गौरव
दोंडाईचा (धुळे) | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील आजोळ असलेल्या आणि महाराष्ट्राची उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू कु. भाविका मनोजकुमार अहिरे हिची भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंका अंडर-19 महिला संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात भाविकाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
भाविका ही डावखुरी फलंदाज आणि यष्टिरक्षक (विकेटकीपर) असून तिने अल्पावधीतच आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2025 च्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातही तिची निवड झाली होती.
भाविकाचा जन्म 11 डिसेंबर 2007 रोजी झाला असून ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लहानपणापासून क्रिकेटची आवड जोपासत तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारली आहे. तिच्या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
श्रीलंका अंडर-19 महिला संघाविरुद्ध भारतात होणाऱ्या मालिकेत तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळविण्यात येणार असून या दोन्ही संघांचे नेतृत्व भाविका अहिरे करणार आहे. भाविकाच्या या निवडीमुळे धुळे जिल्हा, दोंडाईचा परिसर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठीही तिचे यश प्रेरणादायी ठरत आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates
[…] Internal Links : भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाच्… […]