पुण्यात शाहिद कपूर, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत धक्काबुक्की; कार्यक्रम अर्धवट बंद
फिनिक्स मॉलमधील कार्यक्रमात चाहत्यांची प्रचंड गर्दी; सुरक्षा व्यवस्था कोलमडल्याने कलाकारांना काढावा लागला पळ
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना घडली. चाहत्यांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला.
माहितीनुसार, मॅडॉक फिल्म्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे पास किंवा तिकीट व्यवस्था नव्हती. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी हजारो चाहते कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.
कलाकार मंचावर पोहोचताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. अनेकांनी बॅरिकेड्स ओलांडून मंचाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही जण थेट कलाकारांच्या दिशेने धावल्याने कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.
गर्दी इतकी वाढली की बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षकांनाही परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले. यावेळी शाहिद कपूर, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढील अनर्थ टाळण्यासाठी कलाकारांना सुरक्षा व्यवस्थेच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
या घटनेत काही चाहत्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. महिला, लहान मुले आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेमुळे कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मोठ्या सेलिब्रिटी कार्यक्रमांसाठी अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates