तरुणपणातील एका चुकीची म्हातारपणात शिक्षा! 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनंतर तुरुंगवास
1992 मधील हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणी न्यायालयाचा निकाल; वयाच्या 85 व्या वर्षी कारावासाची शिक्षा
बिहार : आयुष्यात केलेली एक चूक किती वर्षांनी समोर येईल आणि त्याची किंमत किती मोजावी लागेल, याचे धक्कादायक उदाहरण बिहारमध्ये समोर आले आहे. तब्बल 34 वर्षे न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात 85 वर्षीय वृद्धासह पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
वैशाली जिल्ह्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 1992 मधील हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांनी मंगळवारी निकाल देताना पाच दोषींना शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील सर्वात वयोवृद्ध आरोपी दीपा राय (85) यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वृद्धापकाळ आणि प्रकृतीचा विचार करून न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीनही मंजूर केला आहे. इतर चार दोषींना प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने सर्व दोषींना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या खटल्यातील चार आरोपींचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित आरोपींविरोधात न्यायालयाने अंतिम निर्णय दिला.
#WATCH | Vaishali, Bihar: A court in Bihar had sentenced an 85-year-old man to three years in prison in a 34 years old a case, with four other accused sentenced to 10 years’ imprisonment each and fined Rs 25,000 in a murderous assault case. (02.06) pic.twitter.com/ohmwSIA1Ri
— ANI (@ANI) June 2, 2026
काय होते प्रकरण?
10 नोव्हेंबर 1992 रोजी जुरावनपूर गावात अदालत राय आणि त्यांची पत्नी घराबाहेर बसले असताना आरोपी त्यांच्या घरासमोर काचेचे तुकडे टाकत होते. यावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी पती-पत्नीवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
34 वर्षांचा न्यायालयीन प्रवास
घटनेनंतर मार्च 1993 मध्ये पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. 17 जून 1999 रोजी आरोपींविरुद्ध दोष निश्चित करण्यात आले. त्यानंतर अनेक वर्षे न्यायालयात सुनावणी सुरू राहिली.
तब्बल तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्याचा निकाल अखेर 2026 मध्ये लागला. त्यामुळे तरुणपणात केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आरोपींना वृद्धापकाळात भोगावी लागणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates