उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये 1 मोठा फेरबदल; राजेंद्र पाल गौतम यूपीचे प्रभारी, संजय दत्त हरियाणाच्या जबाबदारीवर
उत्तरप्रदेश सह काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी, संजय दत्त हरियाणाचे प्रभारी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल जाहीर केले आहेत. पक्षाने माजी मंत्री आणि दलित नेते राजेंद्र पाल गौतम यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी अविनाश पांडे यांची जागा घेतली आहे.
काँग्रेसने हरियाणा, ओडिशा आणि सेवा दलाच्या नेतृत्वातही बदल करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजेंद्र पाल गौतम हे दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडे यापूर्वी अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी होती. उत्तर प्रदेशातील दलित मतदारांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, उत्तर प्रदेशात दलित, ओबीसी आणि इतर सामाजिक समीकरणांवर लक्ष केंद्रित करून काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहे.
दरम्यान, काँग्रेसने संजय दत्त यांची हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी बी. के. हरिप्रसाद यांची जागा घेतली आहे. लालजी देसाई यांच्याकडे ओडिशाचे प्रभारीपद सोपवण्यात आले असून, श्रीनिवास बीव्ही यांची काँग्रेस सेवा दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमधून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
हे देखील वाचा :
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






